धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज



महाराष्ट्र विधान परिषदेच्या उस्मानाबाद- लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या मतमोणीला सुरुवात झाली आहे. भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय),तुळजापूर रोड, धाराशिव येथे ही मतमोजणी होत आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पडत आहे.