जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

Spread the love

धाराशिव – जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद,जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालय,धाराशिव तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जून रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर,कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आणि सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले.हा कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती.अभिश्री देव यांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक व माजी शिक्षक श्री.राजेंद्र गोपाळराव अत्रे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क,अधिकार तसेच त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय सुविधांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहाण यांनी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सोयी -सुविधांची माहिती दिली.ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.तसेच डॉ.धनंजय चाकुरकर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल,असे सांगत विविध विशेष योजनांची माहिती दिली.

अपर पोलीस अधीक्षक श्री.सचिन पांडकर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे पोलीस प्रशासनामार्फत तातडीने निवारण करण्यात येईल, अशी ग्वाही उपस्थितांना दिली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती.भाग्यश्री पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरण सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले.तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या विविध योजनांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती.पाटील यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. भविष्यातही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत अशा प्रकारचे कायदेविषयक जनजागृतीपर उपक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येतील,असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • Related Posts

    १२ सप्टेंबरला जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत ;पक्षकारांसाठी आरोग्य योजनेच्या लाभाची विशेष सुविधा

    Spread the love

    Spread the loveधाराशिव –  न्यायालयीन प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यासाठी येणाऱ्या पक्षकारांना आता शासनाच्या आरोग्य योजनेचाही थेट लाभ मिळणार आहे.जिल्हा न्यायालय,उस्मानाबाद येथे १२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित ‘राष्ट्रीय लोक अदालती’चे औचित्य…

    युवकांनी कायद्याचे भान ठेवून अमली पदार्थ व रॅगिंगपासून दूर राहावे – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

    Spread the love

    Spread the loveसोलापूर -: युवकांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याबरोबरच बालकांचे संरक्षण, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून बचाव आणि रॅगिंगसारख्या गंभीर सामाजिक व कायदेशीर समस्यांविषयी संवेदनशीलता निर्माण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी कायद्याची माहिती…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *