Spread the love

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम

सोलापूर : प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी सायंकाळी ७ वाजता रंगभवन येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री शिवचरित्राच्या सामूहिक पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे गुरुवारी अभिवादन करण्यात येणार आहे. यानंतर श्री शिवचरित्राचे सामूहिक पारायण होणार आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात गावागावांमध्ये श्री शिवचरित्राचे पारायण करण्यात येत आहे. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जीवन समजून घेण्यासाठी प्रत्येक हिंदू बांधवाने श्री शिवचरित्र वाचणे अत्यंत अत्यावश्यक आहे या श्रद्धेतून श्री शिवचरित्राचे पारायण करण्यात येणार आहे. या सामूहिक श्री शिवचरित्र पारायणास आणि पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे करण्यात आले आहे.