पत्रकारांच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषद धाराशिवचा पुढाकार

Spread the love

आरोग्य तपासणी शिबिरात ७१ जणांची तपासणी

धाराशिव – जिल्हा परिषद धाराशिव व आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व प्रसार माध्यमातील प्रतिनिधींसाठी आरोग्य तपासणी शिबिर व विविध शासकीय योजनांची माहिती देणारी कार्यशाळा आज ९ मार्च रोजी आयोजित करण्यात आली. कै.यशवंतराव चव्हाण सभागृह,जिल्हा परिषद धाराशिव येथे पार पडलेल्या या शिबिराला जिल्ह्यातील माध्यमांच्या प्रतिनिधींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये पत्रकारांसह अधिकारी-कर्मचारी अशा एकूण ७१ जणांची तपासणी करण्यात आली.शिबिरात बाह्यरुग्ण तपासणीअंतर्गत २६ पत्रकार व ४५ अधिकारी-कर्मचारी यांनी आरोग्य तपासणी करून घेतली. तसेच प्रयोगशाळा तपासणी ५० जणांची करण्यात आली.मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी ७१ जणांची करण्यात आली असून ईसीजी तपासणी ४६ जणांची करण्यात आली.याशिवाय आयुष्मान कार्ड व आभा कार्ड नोंदणीचे कामही करण्यात आले.

आरोग्य तपासणीबरोबरच जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना व उपक्रमांची माहिती पत्रकारांना देण्यात आली. दुपारच्या सत्रात विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यामुळे पत्रकारांना शासनाच्या योजनांची अचूक माहिती मिळून ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या आरोग्य शिबिरास जिल्हा परिषद धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे,प्रकल्प संचालक अनुप शिंगुलवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) देवदत्त गिरी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक,इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पत्रकारांनी स्वागत केले असून अशा उपक्रमांमुळे पत्रकारांना आरोग्याविषयी जागरूकता मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


  • Related Posts

    व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला मोठे यश

    Spread the love

    Spread the loveपत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीचा प्रश्न अखेर मार्गी; परिवहन मंत्र्यांचे तातडीने आदेश मुंबई : अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून मिळणारी १०० टक्के मोफत प्रवासाची सवलत…

    पत्रकारितेच्या सक्षमीकरणाचा निर्धार; व्हॉईस ऑफ मीडिया च्या राष्ट्रीय अधिवेशनाची उत्साहात सांगता

    Spread the love

    Spread the loveपत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर नवी दिल्ली : देशभरातील पत्रकारांना एकाच व्यासपीठावर आणणारे, पत्रकारितेच्या वर्तमान आणि भविष्यातील दिशेचा वेध…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *