धाराशिव – शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाच्या महिला प्रदेश सचिव संगीता काळे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.
यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, धाराशीव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना सचिव संजय मोरे, मराठवाडा विभागीय सचिव अशोक पटवर्धन, धाराशीव जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके, व्हीजेएनटी विभागाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर दाणे यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगीता काळे यांच्या प्रवेशामुळे पक्षातील महिला संघटनाला नवी ऊर्जा मिळाली असून जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आणखी बळकट होणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सांगितले.