Spread the love

सोलापूर |(प्रतिनिधी) – मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने, सोलापूर शहरातील उत्तर कसबा येथील सौ. रुपाली संदीप वाडेकर यांनी आपल्या घरी आकर्षक देखाव्याद्वारे आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

या देखाव्यातून जरांगे पाटील यांच्या लढ्याशी एकात्मता व्यक्त करण्यात आली असून, परिसरातील महिलावर्गाने मोठ्या उत्साहाने या देखाव्याला भेट देत आंदोलनास पाठिंबा दिला आहे.