
धाराशिव 27 जुलै महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ धाराशिव च्या वतीने वीज वितरण कंपनीमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मागन्या संदर्भात कंत्राटी कामगारांचे आंदोलन सुरू असून आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. कंत्राटी कामगारांच्या मागण्या पुढील प्रमाणे असून कंत्राटी कामगारांच्या किमान वेतन मधील फरक दूर करून सरसकट वेतन मिळावे,2024 पासूनचे कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन देण्यात यावे,
जुन्या आणि अनुभवी कंत्राटी कामगारांना त्या-त्या विभागांमध्ये नियुक्तीचे आदेश देण्यात यावे.महाराष्ट्र राज्य कामगार आरोग्य योजनेचा लाभ कंत्राटी कामगार व त्यांच्या कुटुंबाला लाभ मिळावे . या इतर मागण्या संदर्भात आंदोलन असून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बहुजन हित श्रमिक कामगार क्रांती संघटना महाराष्ट्र चे संचालक ऍड. अजय वाघाळे- पाटील सहभागी झाले व त्यांनी आंदोलकांशी संवाद साधताना म्हणाले कंत्राटी कामगार कायदा 1970 व औद्योगिक विवाद कायदा 1947 च्या कंत्राटी कामगारांना नियम व अटी लागू करा. कंत्राटी कामगारांचे रजिस्टर कंत्राटदाराने अद्यावत करणे, प्रत्येक कंत्राटी कामगारांना ओळखपत्र देणे, कंत्राटी कामगारांना सुरक्षा साहित्य देणे,ज्या कामा करिता कंत्राटी कामगारांची नियुक्ती आहे तेच काम कंत्राटी कामगारांना देण्यात यावे इतर कामे त्याच्याकडुन करून घेऊ नये, कंत्राटी कामगारांने त्याच्या कौशल्य अनुसार इतर कामे केल्यास त्याचा वेगळा मोबदला कंत्राटदराने व वीज कंपनीने द्यावे. कामगार विमा कायदा 1948 प्रमाणे प्रत्येक कंत्राटी कामगारांची नोंदणी करून विम्याचे संरक्षण द्यावे. कंत्राटी कामगार कामावर असल्याचा अहवाल कामगार आयुक्तां यांना पाठवला पाहिजे असे न करणाऱ्या कंत्राटदारावर कार्यवाही झाली पाहिजे व त्यांचा परवाना रद्द करून नवीन कंत्राटदार नियमावे,कंत्राटी कामगारावर नियंत्रण, वेळो वेळी मार्गदर्शन वीज मंडळाचे असले पाहिजे.कंपनीचे कर्मचारी आणि कंत्राटी कामगार हे एकाच प्रकारचे काम करत असल्यास दोघांना समान काम समान पगार मिळाला पाहिजे असे ऍड.अजय वाघाळे पाटील म्हणाले शासनाने वीज मंडळात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्ना विषयी लक्ष देऊन त्यांचे सर्व विषय मार्गी लावावे असेही ते यावेळी म्हणाले. या आंदोलनात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे पदाधीकारी निवेदन स्वीकारले ,निलेश बाळू गिरी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ लातूर झोन अध्यक्ष,उपोषण कर्ते वाजीद जाफर मोमीन,आश्रु महारुद्र शेळवन, ज्ञानेश्वर अच्युत यादव, प्रदीप अर्जुन पाटील,जोत्यीराम दासू पांचाळ,बालाजी विनायक कुंभार,हनुमंत विठ्ठल बचाटे तसेच ऍड बाळासाहेब जाधव, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कायदेशीर सेवा योजना, 2015 विशेष सेलचे सदस्य प्रशांत शशिकांत मते व वीज वितरण कंपनीचे कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.