
मुंबई — राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ₹५७,५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर केल्या.
या निधीचा उपयोग मुख्यतः रस्ते, मेट्रो, सिंचन प्रकल्प, तसेच सिंहस्थ कुंभमेळा नियोजन, महात्मा फुले आरोग्य योजना, संजय गांधी निराधार योजना, शिष्यवृत्ती योजना आणि वंचित घटकांच्या विकासासाठी केला जाणार आहे.