कौडगाव टेक्निकल टेक्स्टाईल पार्कला मोठी गती : १६.५४ कोटींच्या पायाभूत कामांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ

Spread the love

धाराशिव – राज्यातील पहिल्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कच्या उभारणीसाठी कौडगाव येथे महत्त्वपूर्ण आशा पायाभूत कामांचा सोमवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. १६ कोटी ५४ लाख रुपये खर्चून कौडगाव एमआयडीसीत रस्ते व अन्य मूलभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. या उपक्रमामुळे एक निर्णायक पाऊल पुढे पडले असून, धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीचे नवे पर्व सुरू झाल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

कौडगाव एमआयडीसीत ३०८ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कसाठी एमआयडीसीमार्फत एकूण ११४ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये रस्ते, पूल, पाणीपुरवठा, पाइपलाइन, वृक्षारोपण व विद्युतीकरण आदी सुविधा समाविष्ट आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १२.०७ कोटींचा रस्तेविकास व उर्वरित रक्कम इतर खर्चासाठी मंजूर करण्यात आले आहेत.

धाराशिव जिल्ह्यात २०१९ मध्ये महाजनादेश यात्रेदरम्यान झालेल्या जनसभेला संबोधन करताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौडगाव येथे टेक्निकल टेक्स्टाईल पार्कची घोषणा केली होती. त्यानुसार ‘केपीएमजी’ या आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्थेच्या माध्यमातून प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. मात्र, त्यानंतरच्या उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात प्रकल्प रखडला.सत्तांतरानंतर महायुती सरकार सत्तेवर येताच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत याची अधिकृत घोषणा केली असून, एमआयडीसीच्या माध्यमातून प्रकल्प उभारला जाणार असल्याची ग्वाहीही दिली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात प्रस्तवावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टेक्निकल टेक्सटाईल मिशन’ची घोषणा केली. या निर्णयामुळे कौडगाव येथील टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या कामाला अधिक गती मिळणार असून, औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.धाराशिव-बार्शी रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. तसेच कौडगाव एमआयडीसी परिसरात ५० मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प कार्यान्वित झाला आहे, ज्यामुळे या भागात ऊर्जा सुरळीतपणे उपलब्ध होईल.रिलायन्सची गॅस पाईपलाईन या औद्योगिक परिसराजवळून जात असल्यामुळे या भागाला औद्योगिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनेक उद्योजक येथे गुंतवणुकीसाठी उत्सुक असून, या प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट लवकरच साध्य होईल, असा ठाम विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

जगप्रसिद्ध कंपन्यांसोबत राऊंड टेबल कॉन्फरन्स

धाराशिव जिल्ह्यातील कौडगाव एमआयडीसी येथे प्रस्तावित “टेक्निकल टेक्सटाईल पार्क” मध्ये देशी व आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने, एक विशेष राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेत तांत्रिक वस्त्रनिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. तांत्रिक वस्त्रनिर्मितीत जगप्रसिद्ध असलेल्या असाही कासेई कॉर्पोरेशन (जपान),ड्यूपाँट डी नेमूर्स इंक. (अमेरिका),तेजिन लिमिटेड (जपान),एसआरएफ लिमिटेड (भारत),मिलिकेन अँड कंपनी (अमेरिका),फ्रॉइडेनबर्ग ग्रुप (जर्मनी),बेरी ग्लोबल ग्रुप (अमेरिका)किम्बर्ली-क्लार्क कॉर्पोरेशन (अमेरिका),आहलस्ट्रॉम-मुंक्षो (फिनलँड-स्वीडन),जॉन्स मॅनव्हिल (अमेरिका)या आघाडीच्या १० कंपन्यांशिवाय, २४ इतर नामांकित देशी व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनाही कौडगाव MIDC येथील तांत्रिक वस्त्र पार्कमध्ये गुंतवणुकीसाठी सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.यात सहभागी कंपन्यांना कौडगाव MIDC येथे उभारण्यात येणाऱ्या टेक्निकल टेक्सटाईल पार्क अंतर्गत उपलब्ध भौगोलिक व औद्योगिक सुविधा यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

  • Related Posts

    मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) कारखाना कार्यस्थळावर सुरक्षा सप्ताह उत्साहात साजरा

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : (प्रतिनिधी) – तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि, या कारखान्यात ५४ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचीत्य साधुन ६ मार्च रोजी सुरक्षा सप्ताह साजरा…

    जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पाचा दर पंधरा दिवसांनी आढावा ,जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  – जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आपले नियोनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. पर्यटन, उद्योग व शाश्वत सिंचनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी आपण एक कालबद्ध कृती कार्यक्रम आखला आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *