जम्मू कश्मीरच्या पहेलगाम येथील दहशतवादी हल्ला ; जिल्हा प्रशासनाचे आवाहन
धाराशिव – जम्मू कश्मीर येथील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या पहेलगाम येथे काल पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. जिल्ह्यातील जे पर्यटक पर्यटनाला जम्मू कश्मीरला गेलेले आहेत किंवा कालच्या घटनाक्रमाची संबंधित असणाऱ्या नागरिकांनी या अडचणीच्या प्रसंगी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.असे आवाहन केले आहे.
या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत.जम्मू कश्मीरमध्ये पर्यटनाला गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या संदर्भात अडचण असेल, संपर्क होत नसेल,तर जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथील जिल्हा नियंत्रण कक्षातील या ०२४७२- २२५६१८ आणि २२७३०१ हेल्पलाइन नंबरवर तसेच ९६६५०३१७४४ यावर संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा जिल्हा नियंत्रण कक्ष मदतीसाठी सज्ज असून जम्मू-काश्मीरमध्ये थेट संपर्कासाठी काही नंबर प्रशासनाने दिले आहेत,यामध्ये जम्मू कश्मीर प्रशासनाने जारी केलेल्या ०१९४-२४८३६५१,
०१९४-२४५७५४३ तसेच व्हाट्सअप क्रमांक ७७८०८०५१४४, ७७८०९३८३९७ आणि ७००६०५८६२३ या क्रमांकाचा समावेश आहे.यावर देखील संपर्क साधावा.
नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता जर आपले नातेवाईक अडचणीत असेल तर या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शोभा जाधव यांनी केले आहे.