दरोड्याच्या तयारीत असणारे तीन इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Spread the love

धाराशिव – दिनांक 24/03/2025 रोजी मा. पोलीस अधीक्षक, धाराशिव संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयीक गुन्हे उघडकीस आणणे कामी रात्र गस्त पेट्रोलिंग करत असताना पथकास ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्या जवळील जुना पळसप रोड तेरणा माध्यमिक प्रशाला च्या बोर्डाच्या जवळ आले असता रोडचे कडेला अंधारा मध्ये पाच इसम दिसुन आले पथकास संशय आल्याने जवळ जावून पाहणी केली असता दोन ईसम अंधाराचा फायदा घेऊन मोटरसायकलसह पळून गेले व ईतर 03 ईसम मोटरसायकलवर पळून जात असताना पथकाने ताब्यात घेतले व त्यांची चौकशी व पाहणी केली असता नमुद इसमा जवळ दरोडा टाकण्याचे साहित्य मिळून आल्याने सदर इसमांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना त्यांची नावे विचारले असता 1) संतोष प्रभाकर कुराडे, वय 36 वर्ष, रा सुभाष नगर अंकलखोप ता. पलूस जि. सांगली, 2)अविनाश प्रभाकर कुराडे, वय 34 वर्षे, सुभाष नगर अंकलखोप ता -पलूस जिल्हा सांगली, 3)प्रवीण राजाराम मोरे, वय 30 वर्ष, रा. चांदोल वसाहत, आष्टा ता. वाळवा जिल्हा सांगली अशी नावे सांगितली तसेच त्यांची झडती घेतली असता त्यांचे कडे दरोड्याचे साहित्य,कत्ती, कटावणी ,कटर कि अं 600 रु 3 मोबाईल एकुण कि 30000/- गुन्हात वापरलेले मोटरसायकल कि अं 60000/-असा एकूण 90700/-किंमतीचा मुद्देमाल मिळून आला मिळून आलेल्या नमूद इसमांचा गुन्हे अभिलेख तपासला असता त्यांच्यावर धाराशिव तसेच सांगली जिल्ह्यात जबरी चोरीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली. यावरून ते कुठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खात्री झाल्याने सपोनि कासार यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन सदर आरोपी यांच्या विरूध्द पोलीस ठाणे ढोकी गु र नं 97/25 क.310(4),301(5) भा. न्या. सं. सह क 4,25 भा हा का प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या इसमांची वैद्यकीय तपासणी करून पोलीस ठाणे ढोकी येथे पुढील कारवाईस्तव आरोपीस हजर केले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, चालक रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले यांच्या पथकाने केली आहे.

  • Related Posts

    सोलापुरातील डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला मोठं वळण; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी

    Spread the love

    Spread the loveसोलापुरातील डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला मोठं वळण; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सोलापूर – सोलापुरातील ज्येष्ठ मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (७०) यांनी आपल्या…

    पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.”

    Spread the love

    Spread the loveआरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ०७ गुन्हे उघड….. तुळजापूर – दि.१९.०३.२०२५ रोजी पोलीस ठाणे नळदुर्ग हददीतील मौजे गंधोरा पाटी येथे काही अज्ञात चोरटयांनी रिन्यू कंपनीच्या पवनचक्कीचे रखवालदारांना बांधून ठेवून त्यांना…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *