धाराशिव – महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने बुधवार,दिनांक १२ मार्च २०२५ रोजी धाराशिव येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव आणि तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा सकाळी १० वाजता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड,धाराशिव येथे होणार आहे.
या रोजगार मेळाव्यात २५ हून अधिक खाजगी उद्योजक आणि आस्थापना सहभागी होणार असून सुमारे ६०० हून अधिक रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.कॉम्प्युटर इंजिनिअर, मेकॅनिकल इंजिनिअर,कॉम्प्युटर ऑपरेटर,सर्व्हिस इंजिनिअर,ज्युनियर इंजिनिअर,टेक्निशियन,फार्मासिस्ट, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, सिक्युरिटी गार्ड आणि हेल्पर अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे.
या संधीचा जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त एस.आर. गुरव यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी ०२४७२ -२९९४३४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.